अखेर ‘ त्या ‘ आरोपीस वीस वर्षांची शिक्षा , राहुरी तालुक्यातील प्रकरण

one year ago 29

नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून राहुरी तालुक्यातील एका प्रकरणात आरोपीला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली … The post अखेर ‘ त्या ‘ आरोपीस वीस वर्षांची शिक्षा , राहुरी तालुक्यातील प्रकरण first appeared on नगर चौफेर.

नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून राहुरी तालुक्यातील एका प्रकरणात आरोपीला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. 

उपलब्ध माहितीनुसार , किशोर विजय पवार ( वय 27 वर्ष राहणार आरडगाव तालुका राहुरी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला भारतीय दंड संहिता सोबत पोक्सो कायद्याअंतर्गत वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी सुनावली आहे. 

18 जून 2022 रोजी अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलीचे वय अवघे पाच वर्ष असून त्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळण्याचा आवळून तिला ठार करण्याचाही प्रयत्न केला होता. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले. 

The post अखेर ‘ त्या ‘ आरोपीस वीस वर्षांची शिक्षा , राहुरी तालुक्यातील प्रकरण first appeared on नगर चौफेर.


View Entire Post

Read Entire Article